Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पक्ष फंड देत नसल्यामुळे ‘या’ मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराची निवडणूकीतून माघार

पुरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओडीशा राज्यातील पुरी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणुकी लढवण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून निवडणूकीसाठी आर्थिक मदत न मिळाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांचा या मतदारसंघात सामना टीव्ही डिबेटमधून लोकप्रिय झालेले भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासोबत होणार आहे.

परंतू त्यांनी पक्ष मला फंड देत नाही या कारणामुळे निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. तुम्ही तुमच्या फंडाची व्यवस्था स्वत: करा अशी ताकीद पक्षाला मला केली आहे असे यावेळी सुचारिता मोहंती म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता सुरत आणि इंदौर नंतर काँग्रेसला तिसऱ्यावेळी मोठा धक्का बसला आहे.

 

Exit mobile version