Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूरच्या औषध निर्माण महाविद्यालयाला ‘अ’ श्रेणी प्राप्त

8f4f29b6 87cb 4d55 9cc1 a5c84d31f3ce

फैजपूर (प्रतिनिधी) जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सन २०१८-१९ या वर्षांची महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता श्रेणी जाहीर केली त्यात येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण महाविद्यालयाने ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे.

 

याविषयी माहिती देतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील म्हणाले की, आज भारतीय शिक्षणासाठी केवळ पुस्तकी ज्ञान महत्वाचे नसून तांत्रिक कौशल्यासह समाजाभिमुख संशोधन ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने आमचे महाविद्यालय कार्य करीत आहे.आमचे महाविद्यालय ग्रामीण परिसरातील पहिले आय.एस.ओ. ९००० मानांकन प्राप्त केलेले महाविद्यालय आहे. तसेच महाविद्यालय एन. बी.ए. मानांकित असून पुनर्मानांकानासाठी अर्ज केलेला आहे.

येथे विद्यार्थ्यांना अद्ययावत शैक्षणिक व संशोधन सुविधा पुरविल्या जातात.विद्यार्थ्यांचा सामाजिक व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात.यात वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास व करियर मार्गदर्शन यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या सन्मानामुळे संस्थेचे अध्यक्ष शिरिष मधुकरराव चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, सर्व संचालक मंडळ आणि परिसरातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे.

Exit mobile version