Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामपंचायतीसाठीच्या १५ व्या वित्त आयोग अनुदान खर्चाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामासाठी मिळालेल्या १५व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीकडून विकास कामासाठी झालेला खर्च याचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित यांनी घेतला.

ग्रामपंचायतींच्या तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी सर्व आवश्यक सहकार्य करणे आणि तांत्रिक मंजुरी आणि कामाच्या मोजमाप बुक नोंदीसाठी अभियंते दिले आहेत. अधिक जलद गतीने कामं व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना देण्यात आल्या तसेच राहिलेल्या कामाचे पुढील आठ दिवसात तांत्रिकबाबी पूर्ण करून काम सुरु करावेत.आदेश देऊन कामे सुरू करण्याबाबत कार्यवाही करा. हे काम करतांना कोणतेही नियमबाह्य काम होणार नाही हे कटाक्षानी पाळण्याचे आदेशही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
शून्य खर्च असलेल्या ग्रामपंचायतीच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ तांत्रिक अडचणी सोडविण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या. ग्रामपंचायतची खरेदी करतांना जेम प्रणालीचा वापर करावा तसेच सरपंच व ग्रामसेवक यांनी जेम वर नोंदणी करून घ्यावी असे सांगण्यात आले.

Exit mobile version