Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगाराला जिल्हाधिकारी यांनी केले स्थानबद्ध

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमपीडीए कायद्यांतर्गत रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश काढले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी  शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. विश्वास अरूण गारूंगे (वय-४२) रा. समता नगर, जळगाव असे हद्दपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वास अरूण गारूंगे हा गुन्हेगार परिसरात अवैधरित्या गावठी दारू बनविणे व त्याची विक्री करणे व शासनाच्या आदेशाने उल्लंघन करणे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे एकुण १८ गुन्हे रामानंद नगर पोलीसात दाखल आहे. शिवाय त्याच्यावर या आधि ४ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली. परंतू त्याच्या कोणतीही सुधारणा झाली नसल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी अहवाल तयार करून जिल्हा मुख्यालयात पाठविला. रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे प्रस्तावाचे अवलोकन करून जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आलेल्या प्रस्तावानुसार अरूण गारूंगे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात  कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश केले आहे.

 

हे कारवाई रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षका शिल्पा पाटील यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनील दामोदरे, राजेश चव्हाण, विजय खैरे, पोलीस नाईक देवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, इरफान मलिक, महिला पोलीस कॉन्स्टेबल राजश्री पवार यांच्यासह आदींनी ही कारवाई केली आहे.

Exit mobile version