Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मतदार जागृती गीताच्या कलावंतांचा सत्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यभर ‘चला, चला मतदान करु चला !’ या मतदार जनजागृतीपर गीताला प्रसिद्धी मिळाली. मतदारांना प्रभावित करणाऱ्या या गीतकार, गायक ते टीम या सर्वांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गौरव केला.यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी अरविंद अंतूर्लीकर उपस्थित होते.
या गीताचे गीतकार मनोहर आंधळे,

संगीतकार आप्पा नेवे, गायिका तथा नायब तहसीलदार प्राजक्ता केदार,निर्मिती सहाय्यक प्रांताधिकारी प्रमोद हिले,मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, निर्माता तथा लोकशाही माध्यम समूहाचे संचालक राजेश यावलकर, डॉ. अमोडकर, शुभदा नेवे आदींचा जिल्हाधिकारी यांनी गौरव केला.

हे गीत अनेकांच्या सोशल मीडिया हँडलवर असून संपूर्ण महाराष्ट्रभर हे गीत मतदार जागृतीसाठी म्हणून गौरविले जात आहे.
जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या पत्नी, प्रख्यात उद्योगपती अशोक जैन, फैजपूर प्रांताधिकारी देवयानी यादव, आय.एम.ए सचिव डॉ. अनिता भोळे, डॉ. विलास भोळे, तहसीलदार शितल राजपूत, ज्येष्ठ संपादिका शांता वाणी, कमलाकर वाणी, कविता ठाकरे, डॉ. प्रमोद अमोडकर, शुभांगी यावलकर, तृतीयपंथी बेबो, दिव्यांग विमल कोळी, विवेक कुलकर्णी, सुभाष गोळेसर तसेच नशिराबाद गावातील नागरिकांनी भूमिका साकारल्या आहेत. हे गीत लोकशाही माध्यम समूहाने विनामुल्य निर्मित केले आहे.

Exit mobile version