Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी – प्रशासनाचं आवाहन

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हतनुर धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे ४१ पैकी १६ गेट पूर्ण उंचीने उघडलेले असून पाणी पातळीच्या वर काढण्यात आहे.

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हतनुर धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे ४१ पैकी १६ गेट पूर्ण उंचीने उघडलेले असून पाणी पातळीच्या वर काढण्यात आहे. तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

तापी नदीपात्रामध्ये सध्यस्थितीत ४२,२७२ क्युसेक्स  इतका विसर्ग सुरू असून आज रात्री ५०,००० ते ७५,००० क्युसेक्सपर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे.

तरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये. नदीच्या परिसरात गुरं ढोरं सोडू नये. असं आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या वतीने करण्यात आलं आहे.

 

Exit mobile version