Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्र सरकार मैतेई व कुकी समुदायांशी चर्चा करणार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मणिपूर हिंसाचार आणि राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी १७ जून रोजी दिल्लीत बैठक घेतली. गृह मंत्रालय मेईतेई आणि कुकी समुदायांशी चर्चा करेल, असे ठरले आहे. गृहमंत्री शहा यांनी राज्याचे मुख्य सचिव विनीत जोशी यांना विस्थापित लोकांसाठी योग्य आरोग्य-शिक्षण सुविधा आणि त्यांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात केंद्रीय दलांची तैनाती गरजेनुसार वाढवली जाईल. मणिपूरमध्ये शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी रणनीतीने सैन्य तैनात केले जावे. शहा यांच्या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे प्रमुख तपन डेका, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह, मणिपूरचे मुख्य सचिव विनीत जोशी, मणिपूरचे डीजीपी राजीव सिंह आणि आसाम रायफल्सचे डीजी प्रदीप चंद्रन नायर उपस्थित होते.

Exit mobile version