Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सीबीएसईची दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरु

EXAM

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १०वी आणि १२ वी परीक्षांची तारीख जाहिर केली आहे. येत्या दि.१५ फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षेना सुरुवात होणार आहे.

सीबीएसईने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दोन्ही वर्गांतील उमेदवारांसाठीच्या परीक्षेची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत अशी आहे. तथापि, त्या पूर्वी सकाळी १० ते रात्री १०:१५ या वेळेत परीक्षार्थिंना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. तर, सकाळी १०.१५ ते १०:३० दरम्यान प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातील. दहा वाजण्यापूर्वीच परीक्षार्थिंनी परीक्षा हॉलमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. १५ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षा २० मार्चपर्यंत घेण्यात येणार आहेत. २६ फेब्रुवारी रोजी इंग्रजी, २ फेब्रुवारी रोजी इंग्रजी, ४ मार्च रोजी विज्ञान, ७ मार्चला संस्कृत, १२ मार्च रोजी गणित, १ मार्च रोजी सामाजिक विज्ञान आणि २० मार्च रोजी माहिती कम्यूनिकेशन तंत्रज्ञान आणि संगणक अप्लीकेशन परीक्षा घेण्यात येतील. इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा शेवटचा दिवस ३० मार्च असणार आहे. २२ फेब्रुवारी पासून सायकॉलॉजी, २ फेब्रुवारी रोजी इंग्रजी, २ मार्च रोजी भौतिकशास्त्र, ३ मार्चला इतिहास, ५ मार्चला अकाउंटन्सी, ६ मार्चला राजकीयशास्त्र, ७ मार्चला रसायनशास्त्र, १४ मार्चला जीवशास्त्र, १७ मार्चला गणित, २० मार्च रोजी हिंदी, २३ मार्चला भूगोल आणि ३० मार्चला समाजशास्त्राची परीक्षा होईल.

Exit mobile version