Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्लेड मारून पिशवीतील ५३ हजारांची रोकड लांबविली

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वृध्द महिलेजवळील कापडी पिशवीला ब्लेड मारून ठेवलेले ५३ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबवल्याची खळबळजनक घटना भडगाव शहरातील बँक ऑफ बडोदा जवळ घडली आहे.

भडगाव शहरातील आझाद चौका भोईवाडा येथे राह्याबाई नामदेव भाई (वय-६७) या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता त्या बँकेत गेल्या होत्या. बँकेतून त्यांनी ५३ हजार रुपयांची रोकड काढली. त्यानंतर पैसे कापडी पिशवी ठेवले आणि घराकडे जाण्यास निघाले. दरम्यान रस्त्याने पायी जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या कापडी पिशवीला ब्लेड मारून पिशवीतील ५३ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृद्ध महिलेने तातडीने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती सांगितली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पुढे शेड कॉन्स्टेबल किरण पाटील करीत आहे.

Exit mobile version