Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळयाचे कार्ड आले समोर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पाडला. या सोहळ्याला विदेशी पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. बांगलादेश, भूतान, श्रीलंकेचे पंतप्रधान तर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर अनेक राजकीय नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकूण 7000 हजार लोक सोहळ्याला उपस्थित राहाणार असल्याचे सांगितलं जातंय. रविवारी संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेची पहिला फोटो समोर आला आहे. शुक्रवारी एनडीएच्या (NDA) संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर मोदी यांनी राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मु यांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रपतींना रविवारी त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिले. शपथग्रहण सोहळ्याला अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहाणार आहेत. यासाठी दिल्लीत सुरक्षेचा कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत नो फ्लाईग झोन घोषित करण्यात आला आहे. राष्ट्रवदी भवनची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि इतर अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहाणार आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष वावेल रामखेलावान यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला छावणीचं रुप आलं आहे. प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत नो फ्लाईग झोन घोषित करण्यात आला आहे. ड्रोन उडवण्यावर किंवा पॅराग्लाइडिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 9 आणि 10 जूनला दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. राष्ट्रपदी भवनला निमलष्करी दलाच्या 5 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. तसंच एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर तैनात केलं जाणार आहेत.

Exit mobile version