Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरखेडी येथे कारने मजूराला चिरडले

पाचोरा प्रतिनिधी । येथील वरखेडी नाक्याजवळ सायकलवरुन वर्धमान दाल मिल येथे कामावर जाणाऱ्या मजुरास समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा (योध्दा) कारने जोरदार धडक दिल्याने मजुराचा जागीच मृत्यु झाला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी जवळील बंजार वाडी, श्रीकृष्ण नगर भागात रहिवाशी असलेल्या रमेश राजाराम हटकर (वय – ४५) हा मजुर मोंढाळे रोडवरील वर्धमान दाल मिल मध्ये मजुरी करत असुन गुरुवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान जेवणासाठी घरी आल्यानंतर जेवण आटोपून दुपारी २ वाजुन ३० मिनिटांनी कामावर परत जात असतांना समोरुन चाकण (पुणे) येथुन एका मागे एक विना पासिंग (नविन) असलेल्या  टाटा (योध्दा) ही चार वाहने गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे जात असतांना त्यातील अनिल सुर्यकांत बर्डे मु. पो. पिंप्री निर्मळ, ता. राहता, जि. अहमदनगर या चालकाच्या टाटा (योध्दा) या वाहनाने रमेश हटकर यांना जोरदार धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या विज खांबास आदळले. 

या धडकेत रमेश हटकर हे खाली पडुन ड्रायव्हर साईडच्या पुढच्या चाका खाली दाबले गेले. त्यांचे डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मयताचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, तीन लहान मुली असा परिवार असुन मृताच्या नातेवाईकांचा पोलिस स्टेशनसमोर मोठा जमाव जमला होता. वृद्ध आई व चार मुलांचा एकुलता एक कमवता मुलगा आणि वडील गमावल्याने आई व पत्नीने एकच आक्रोश केला होता.

 

Exit mobile version