Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनवेल येथे घरफोडीत सोन्याचे दागिन्यांसह रोकड लांबविली

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेले. घरातील व्यक्ती उठल्याचे पाहून चोरटे पसार झाले. याप्रकरणी शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अरूण कालुसिंग पाटील रा. मनवेल ता. यावल जि.जळगाव हे दोन मुले आणि सुन यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवार २७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता सर्वजण जेवण करून झोपले. मध्यरात्री अज्ञात दोन चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात घुसून अरूण पाटील यांच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटात चोरी करत होते. शुक्रवार २८ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास  कपाटाचा खळखळ आवाज आल्याने अरूण पाटील हे झोपेतून जागे झाले तर दोन चोरटे डोक्यात टोपी घालून चोरी करत होते. अरूण पाटील यांना पाहून चोरटे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अरूण पाटील याचा मुलगा तेजभान अरूण पाटील यांनी सकाळी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र खैरनार करीत आहे.

 

Exit mobile version