Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विटभट्टी कामगार तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा गावातून विटभट्टी कामगार तरूणाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी बुधवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन संतोष कुंभार (वय-२५) रा. तरसोद रोड, आसोदा ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. विटभट्टीवर काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेच्या पुर्वी त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएल ६३७१) ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. सचिनने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहे.

Exit mobile version