Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘द ब्रेड ऑफ लाईफ’ ने जिंकली रसिकांची मने; जामनेरात नाटकाचे आयोजन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । ‘आझादी का अमृत महोत्सवा’ अंतर्गत ‘केंद्र सरकार व सांस्कृतिक विभाग, नवी दिल्ली आयोजित ‘मेराकी’ परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशन, नागपूर यांनी मंगला सानप (राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली) दिग्दर्शीत ‘द ब्रेड ऑफ लाईफ : डॉ. पांडुरंग खानखोजे, द अनसंग हिरो’या नाटकाचे रविवारी एकलव्य विद्यालय जामनेर येथे आयोजन करण्यात आले होते. आनंदयात्री परिवार व रोटरी या संस्थेने या उपक्रमाचे संयोजक केले होते.

वर्धा जिल्ह्यातील क्रांतिकारी कृषी शास्त्रज्ञ पांडुरंग खानखोजे यांचे भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात सर्वात मोठे योगदान आहे, त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य अनमोल आहे, तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्या भारतीय लोकांची देशासाठी मदत आणण्याची महत्वाची भूमिका बजावली. ‘द ब्रेड ऑफ लाईफ- डॉ खानखोजे: द अनसंग हिरो’ हे नाटक त्यांच्या जीवनावर आधारित होते.

या नाटकामुळे आम्हाला अपरिचित क्रांतिकारक डॉ.खानखोजेंबदल माहिती मिळाली’अशा व इतर अनेक प्रतिक्रिया नाट्यरसिकांनी व्यक्त केल्या. या नाटकात कलावंत पुष्पक भट, हर्षवर्धन देशमुख, कृष्णा लाटा, ऋतुराज वानखेड़े, शुभम गौतम, अविनाश अरोरा, श्रेयस  भारसाकळे, कुणाल टोंगे, कुणाल मेश्राम, सिद्धांत पटेल, चैतन्य दुबे, अनुक्षा आर्गे, महक त्रिपाठी, निश्चय बेलानी, बुद्धांश, शुभम शेंडे यांची लक्षवेधी भूमिका होती

या प्रयोगासाठी प्रकाशयोजना अक्षय खोब्रागडे, संगीत संयोजन नारायण, संगीत संचालन निकीता ढाकुलकर,रंगभूषा व वेशभूषा ऋतुजा वानखेडे , नेपथ्य अलियर,  अंकित ठाकरे, शुभम गौतम, प्रबंध व समन्वयन हितेश यादव, मयूर मानकर यांचे तर कला सहायक रितेश, सिनोग्राफी अलियर यांचे लाभले. या उपक्रमासाठी विशेष सहाय्य सुनील खानखोजे व सावित्री पांडुरंग  यांचं लाभले.

या कार्यक्रमासाठी अडव्होकेट शिवाजी साठे, कडू माळी, रुपेश पवार, प्रा.जे.पी.पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी डॉ.अमोल सेठ, डॉ.चंद्रशेखर पाटील,डॉ पराग पाटील, गणेश राऊत, डॉ आशिष महाजन, अमरीश चौधरी, डॉ नरेश पाटील, सुहास चौधरी, बंडू जोशी, कडू माळी, संकेत पमनाणी, नितीन पाटील, सुधीर साठे, आनंदयात्री परिवार व रोटरी क्लब यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version