Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रात्री सोबत जेवणं केलेल्या मुलानं केलं असं काही… कुटूंबाचा आक्रोश !

रात्री हसत खेळत आईवडील आणि बहिणीसोबत जेवणं केल. झोपायला जात असल्याचे सांगून वरच्या खोलीत गेला. मुलाने छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे  सकाळी उठविण्यासाठी गेलेल्या बापाला जबर धक्काच बसला.

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील १९ वर्षीय युवकाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेजस धोंडू पाटील (वय-१९) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत युवकाचे नाव आहे.

 

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तेजस पाटील हा आईवडील आणि लहान बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. त्याच्या वडिलांचे गॅरेजचा व्यवसाय आहे. तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या व्यवसायात मदत करत होता. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता तेजस हा आईवडील आणि बहिण यांच्यासोबत जेवण केले. आणि झोपण्यासाठी ते वरच्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत गेला. दरम्यान, मध्यरात्री त्याने सुताची दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सकाळी वडील धोंडू पाटील हे मुलाला उठविण्यासाठी गेले असता मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांचा धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेतली. एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सदाब सय्यद करीत आहे.

 

Exit mobile version