Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिरसोली ते जळगाव डाऊन रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी समोर आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

शिरसोली ते जळगाव डाऊन रेल्वे मार्गावर मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका अनोखळी ३५ ते ४० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत उपस्टेशन प्रबंधक के.जी.चौधरी यांनी रामानंद नगर पोलीसांना माहिती दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटेल असे कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले असून नातेवाईकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. या घटनेचा पुढील  तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

Exit mobile version