Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोर आढळला अनोळखी पुरूषांचा मृतदेह

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ आज सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. याप्रकारणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जळगाव शहरातील श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ सोमवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबत काही सुज्ञ नागरीकांनी शहर पोलीसांशी संपर्क करून माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. खानेता पठाण यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयताची ओळख पटवावी. असे आवाहन शहर पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल बडगुजर करीत आहे.

Exit mobile version