Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोळीपेठ परिसरात अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोळीपेठ येथे अंदाजे अनोळखी ६० वर्षीय वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील कोळी पेठ परिसरातील गोडावून जवळ एका अनोळखी ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. परिसरातील नागरीकांनी शनीपेठ पोलीसांना घटनेची माहिती दिली. शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. मयताचे ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील करीत आहे.

Exit mobile version