Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहरात आढळला बेवारस वयोवृद्धेचा मृतदेह

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागे एका ७० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह काल संध्याकाळी आढळून आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 शुक्रवार, दि. १० जून रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागील पाण्याच्या टाकीजवळ सुरक्षा रक्षक राजेंद्र कृष्णा पाटील हे त्या ठिकाणाहून जात असतांना त्यांना एका ७० वर्षीय अनोळखी वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सुमारास आढळून आला.

त्यांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान सदर वयोवृद्धाची ओळख अद्याप पटलेली नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना अमित बाविस्कर हे करीत आहे.

Exit mobile version