Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्टेशन रोड परिसरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील अंकल ट्रव्हल्सच्या कार्यालयासमोर एका ५० वर्षीय अनोळखी पुरूषांचा मृतदेह आढळून आल्याची घटना अाज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील अंकल ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर गुरूवार ९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अंदाजे ५० वर्षीय अनोळखी पुरूष मयत स्थितीत आढळून आले. यासंदर्भात प्रौढ व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. सहाय्यक फौजदार चऱ्हाटे व पोलीस कॉन्स्टेबल संतोष खवले यांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला आहे. वैद्यकीय अधिकारी महाजन यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Exit mobile version