Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साकरीत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील साकरी येथील शेतकऱ्याचा मृतदेह शेतात आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानदेव वनराज बोरोले (वय-52) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बोरोले हे मंगळवारी शेतात गेल्यानंतर परत न आल्याने त्याचा शोध सुरू असतानाच शेतातच त्यांचा मृतदेह दुपारच्या सुमारास आढळल्याने साकरी गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी भेट देऊन पहाणी केली. मृत बोरोले यांच्या मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले तर पोलिसांनी इन्क्वेस्ट पंचनामा केला. मृत्यूचे कारण मात्र विच्छेदन झाल्यावरच समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे अधिक तपास करीत आहेत.

 

Exit mobile version