Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपाला चढली सत्तेची मस्ती; काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील (व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 03 29 at 18.01.52

 

जळगाव प्रतिनिधी । नुसते आश्वासनांच्या घोषणा देवून सत्ता मिळविणारे हे भाजपा सरकार नोटबंदी करून देशाचे कंबरडे मोडले त्यांना आता सत्तेची मस्ती आले आहे. त्यामुळे त्यांची मस्ती आता लोकसभा निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखविणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाच्या खासदार यांनी किती काम केले. कोणत्या योजना आणल्या, दिलेल्या अश्वासनांची कोणती अंमलबजावणी केली. याचा लेखाजोखा तयार करण्यात आला आहे. तसेच रावेर लोकसभा मतदार संघात ठोस असे कोणतेही कामे अजून तरी दिसून आले नाही. त्यामुळे नुसते जनतेला अश्वासन देवून निवडणुक जिंकता येत नाही, त्यासाठी कामेही करावी लागतात. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वठणीवर आणण्याचे काम मतदार यांच्या मतातून दिसून येणार आहे.

 

अधिकृत उमेदवाराची घोषणा लवकरच – माजी खासदार उल्हास पाटील
रावेर लोकसभा उमेदवारीबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि काँग्रेस यांच्या समन्वयाने रावेरची जागा मिळावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. कॉग्रेसचा मागचा इतिहास बघितला तर रावेरची जागा नेहमी काँग्रेसपक्षाकडे राहिलेली आहे. अधिकृत उमेदवार कोण असेल यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लवकरच करणार असल्याची माहिती माजी खासदार उल्हास पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, शहर महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, सरचिटणीस जिजाबराव पाटील, कार्यकर्ते उल्हास साबळे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हापदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

काँग्रेसच्या पक्षात एकजूट आहे. रावेर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी काँग्रेसला मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. रावेरची जागा ही पारंपारिक काँग्रेसची जागा आहे. चोपडापासून ते नांदूरापर्यंत जागेवर काँग्रेसची जागा होती. चोपडा तालुक्यात सुरेश पाटील त्याचे पत्नी अक्काताई पाटील यांचे मुलगा संदीपभैय्या पाटील हे जळगाव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे. रावेर, यावल तालुक्याचे कै. धनाजीनाना चौधरी, कै. मधूकराव चौधरी आणि त्याचे पुत्र माजी आमदार शिरीषदादा चौधरी, जामनेर आणि भुसावळातील संतोष चौधरी असे नेते मोठ्या संख्येने काँग्रेसचे नेते असल्याने ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी आधीपासून होती. त्यामुळे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात होते. रावेर लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी केल्यानंतर राष्ट्रवादीने मागचा इतिहास बघितला आणि पुन्हा एकदा काँग्रेसला संधी दिली आहे.

काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी यापुर्वीच मुलाखती घेतल्या गेल्या होत्या. त्यानुसार माजी खासदार उल्हास पाटील यांचे नावे निश्चित झाले असून त्यांची अधिकृत घोषण होण्याची बाकी आहे. तसेच आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने सर्व तयारी महिनाभरापासून सुरू होती अशी माहीती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.

 

 

*पहा ।* जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांची प्रतिक्रिया

Exit mobile version