दर्शन कॉलनीतून दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील दर्शन कॉलनीत मध्यरात्री घरासमोर पार्किंगला लावलेली २० हजार रुपये किमतीचे दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात  चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किसन मोजीलाल पवार (वय-२६) रा. हायवे दर्शन कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १३ जून रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर लावलेली २० हजार रूपये किंमतीची दुचाकी (एमएच 19 सीजी ५९४९) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी १४ जून रोजी सकाळी उघडकीला आला. पवार यांनी  दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतू दुचाकी कुठेही आढळून न आल्याने त्यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार १४ जून रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गुलाब माळी करीत आहे.

Protected Content