Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापालिका आवारातून दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या पार्कींग झोनमधून दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, रमेश पुंडलीक चौधरी वय-५८ रा. अयोध्यान नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पानटपरी चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १७ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता ते दुचाकी क्रमांक एमएच १९ सीटी ९३४० ने जळगाव शहरातील महानगरपालिकेत कामाच्या निमित्ताने आलेले होते. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या आवारातील पार्कींग झोनमध्ये आपली दुचाकी पार्क करून लावली होती.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ हे करीत आहे.

Exit mobile version