जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनीत घरासमोर उभी दुचाकी लांबविल्याप्रकरणी मंगळवार, १४ जून रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात तुकाराम यादव पाटील वय ७१ हे वास्तव्यास आहेत. त्यांनी ९ जून रोजी दुपारी १२ ते दीड वाजेदरम्यान त्यांची एम.एच.१९ बी.सी ३३१९ या क्रमांकांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. दीड वाजता घराबाहेर पडल्यावर दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने तुकाराम पाटील यांनी याबाबत मंगळवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहेत.