Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साकेगाव येथील तरुणाची दुचाकी मध्यरात्री फोडली

साकेगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे राहणाऱ्या एका तरुणाची दुचाकी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने फोडून नुकसान केल्याची घटना गुरुवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता समोर आले. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत रमेश राणे (वय-३२, रा. साकेगाव ता. भुसावळ ) हा तरुण आपले परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी व्यवसाय करून तो आपला उदरनिर्वाह करतो. त्यांची दुचाकी (एमएच 14 जेक्यू 5482) ही घरासमोर पार्किंगला लावलेली होती, अज्ञात व्यक्तीने गाडीचे हेडलाईट व इतर समान  फोडून नुकसान केले आहे.  हा प्रकार गुरुवार २१ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता समोर आले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version