Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथील पंचवार्षिक निवडणुकीचा वाजला बिगुल

रावेर प्रतिनिधी । रावेर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या ५ फेब्रुवारीला १८ संचालकांसाठी मतदान होणार आहे.

विद्यमान संचालकांनी केळी, कपाशी, ज्वारी, मका उत्पादक शेतक-यांच्या हीतासाठी कोणते निर्णय घेतले याची आता चर्चा शेतक-यांमध्ये सुरु झाली आहे. पाच वर्ष येथे सर्वपक्षकीय पॅनलची एक हाती सत्ता होती.परंतु केळी संदर्भात भाव काढण्याचा जेटील प्रश्न विद्यमान संचालकांना सोडविता आला नसल्याने शेतकऱ्‍यांमध्ये नाराजीचा सुर आहे.

केळी पट्यातील महत्वाची मानली जाणारी रावेर बाजार समितीची आर्थिकस्थिती चांगली आहे. म्हणुन येथे निवडणूक लढवीण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असतो. येथे निवडणूक लढण्यासाठी प्रचंड चढाओढ यंदा होणार आहे. आमदार शिरीष चौधरी व माजी आमदार अरुण पाटील दोघे शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातुन पॅनल देण्याच्या तयारीत आहे. तर भाजपा’ने अद्याप आपले पत्ते ओपन केले नाही.मागील पंचवर्षिक निवडनुकांमध्ये मध्ये सर्वपक्षीय पॅनलला एकहाती सत्ता माजी मंत्री एकनाथ खडसे व माजी आमदार अरुण पाटलांवर विस्वास ठेवूण मतदारांनी जनादेश देऊन सत्तेत बसविले होते. त्यामुळे मागील पाच वर्षात शेतक-यांच्या हीताचे किती निर्णय घेण्यात आले हे जनते समोर मांडण्याची वेळ आता विद्यमान संचालकांना आली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक शेतक-यांच्या प्रश्नावर गाजणार की आर्थिक गणितांवर याची मात्र चर्चा सुरु झाली आहे. विद्यमान संचालकांपैकी काही संचालक येथे निवडणूक लढणार नसल्याची माहीती राजकीय सूत्रांनी दिली आहे.

शेतक-यांच्या समस्या जैसे-थे

मागील पाच वर्षात शेतक-यांच्या समस्या सोडविण्यात सभापती उपसभापतीसह संचालक मंडळा फारसा करिश्मा करता आला नाही. शेतकऱ्यांच्या मालाची लुबाडणूक होऊ नये, त्याच्या मालाला योग्य किंमत मिळावी, किंमत मिळण्यासाठी लिलाव पद्धतीत स्पर्धा व्हावी व शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे मिळण्याची हमी देता यावी,तसेच उत्पादन वाढविण्यासाठी शेतक-यांची इतर ठिकाणी दौरे करता यावे त्यांच्यासाठी मोबलक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासह इतर प्रश्न सोडवीण्यासाठी रावेर तालुक्यातील  मतदार येथे संचालक मंडळ निवडणूक देत असतो. परंतु मागील पाच वर्षात सभापती उपसभापती पदे मिळवीण्या व्यतिरीक्त कोणतेच काम झाले नाही. मागील पाच वर्षात केळी उत्पादक शेतक-यांच्या समस्या सोडविण्यात बाजार समितीला फारस यश आले नाही.मात्र याला सभापती म्हणुन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी अपवाद आहे.त्यांच्या कार्यकाळ  चांगला गेला त्यांच्या कार्यात त्यांनी शेतक-यांशी थेट संपर्क व बाजार समितीला सर्वाधिक उपन्न वाढवुन दिले.

निवडणुकीत तिन पॅनल होण्याची शक्यता 

रावेर कृषी उपन्न बाजार समितीत यंदा तिन पॅनल होण्याची दाट शक्यता आहे.आ शिरीष चौधरी माजी आ अरुण पाटील मिळुन महाविकास आघाडीच्या माध्यमातुन पॅनल देण्याची शक्यता आहे. तर जि प सदस्य नंदरकिशोर महाजन सुरेश धनके भाजपाचे स्वतंत्र पॅनल देण्याच्या विचारात आहे. महाविकास आघाडी व भाजपाच्या पॅनलमध्ये ज्यांचे पत्ते कापले जातील असे स्वतंत्र तिसरे पॅनल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

बाजार समितीला पाच वर्षात सात सभापती

२०१६ मध्ये एकहाती सत्ता मिळालेल्या संचालक मंडळ आपला वेळ सभापती उपसभापती पदे मिळविण्यावर घातला आहे.पाच वर्षात सात सभापती बाजार समितीने बघितले आहे. यामध्ये २०१६ मध्ये वर्ष भरासाठी पितांबर पाटील (भाजपा) २०१७ वर्ष भरासाठी डॉ राजेंद्र पाटील (कॉग्रेस)२०१८ वर्ष भरासाठी निळकंठ चौधरी (राष्ट्रवादी) २०१९ मध्ये सहा महीने राजिव पाटील (कॉग्रेस) डी सी पाटील (कॉग्रेस) २०२० मध्ये वर्ष भरासाठी श्रीकांत महाजन (भाजपा) २०२१ मध्ये गोपाळ नेमाडे सभापती पदे भूषवली आहे.

बाजार समितीत निवडणुकीसाठी नविन चेहरे उत्सुक

रावेर कृषी उपन्न बाजार समितीसाठी निवडणुक लढविण्यासाठी अनेक नविन चेहरे कॉग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा कडून इच्छुक आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक संदर्भात इच्छुक असणा-यां सामाजातील काही प्रतिष्टितांची गुप्त बैठक झाली असून लवकर ते आ शिरीष चौधरी माजी आ अरुण पाटील आ चंद्रकांत पाटील यांना भेटणार आहे.महाविकास आघाडीतुन त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी विनंती केली जाणार आहे. विद्यमान संचालकां पैकी चांगले काम करणा-यांना देखिल सोबत घेण्याचा सुर बैठकीत झाला.या गुप्त बैठकी पासुन पत्रकारांना मात्र लांब ठेवले होते.

 

Exit mobile version