रावेर तालुक्यात कोरोना रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहिती झाली सोपी

रावेर प्रतिनिधी । रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यातील कोरोना रूग्णांना दाखल करून घेत नसल्याचा प्रकार होत आहे.तालुक्यातील बेड उपलब्धतेची माहिती सुलभ होण्यासाठी जिल्‍हाधिकारी यांनी हेल्पलाईन कक्षाची उभारणी केली आहे. आता तालुक्यातील बेडची स्थिती कशी आहे याची माहिती तत्काळ मिळणे शक्य झाले आहे.

जिल्ह्यात आता पुरेसे बेड उपलब्ध आहे. कोवीड रूग्णांनी घाबरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्यूजच्या माध्यमातून केले आहे.  आज २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी तहसील प्रशासनाला बेड उपलब्धतेसाठी कक्षाची उभारणी करण्याच्या सुचाना केल्या. रावेर तालुक्यासह इतर तालुक्यातील रूग्णांसाठी हेल्पनंबर, नोडल अधिकारी, बेड मॅनेजमेंटर कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षात डाटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्त तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केली आहे. 

अखेर तहसील प्रशासनातर्फे बेडसाठी हेल्पनंबर जारी

बुऱ्हाणपुर येथे ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दखल घेत नागरीकांचा संभ्रम दुर केला. जिल्ह्यात बेड शिल्लक असल्याचे सांगत रावेर तालुक्यातील नागरीकांसाठी  बेड माहिती व्हावी म्हणून ०२५८४- २५०५७३ हेल्पनंबर इन्सिडंन्ट कमांडर तथा तहसीलदार यांनी जारी केला. याठिकाणी CCC, DHC, DCHC येथे ऑक्सिजन संदर्भात माहिती घेऊ शकणार आहे.

 

नोडल अधिकारी बेड मॅनेजमेंटर नियुक्ती

दरम्यान बातम्यांची दखल घेऊन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी आज वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रणात ऑक्सिजन बेड संदर्भात हेल्पनंबर जारी केला. रूग्णांसह नातेवाईकांना अधिक माहिती व्हावी म्हणून नोडल अधिकारी बेड मॅनेजमेंटर म्हणून गटशिक्षणधिकारी शैलेंश दखने यांची नियुक्ती करण्यात आली. सोबत हेल्पलाईन  कक्षाचे कामकाज बघण्यासाठी किशोर पवार यांची डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Protected Content