Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना वाव- रणजित शिंदे

WhatsApp Image 2019 03 10 at 7

अमळनेर (प्रतिनिधी)-  सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शाळांमधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास होतो असे सरस्वती विद्या मंदिर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक रणजित शिंदे बोलत होते. अमळनेर येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचा विविध कलागुण प्रदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘रंगारंग उत्सव’ नुकताच उत्साहात संपन्न झाला.यावेळी आयोजित आंनद मेळाव्यात विद्यार्थिनींनी मोठ्यासंख्येने सहभाग घेतला.

श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर शाळेत सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कला गुणांचे प्रदर्शन करणारा कार्यक्रम ‘रंगारंग उत्सव’आयोजित करण्यात येतो.उदघाटन प्रसंगी मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले.प्रास्ताविक सौ.संगिता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सौ.गीतांजली पाटील यांनी केले. अहिराणी ,मराठी, हिंदी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर केलीत. यावेळी विविध रंगछटा असलेल्या वेष परिधान करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींना उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देत प्रोत्साहन दिले. बालगोविंदा ने सादर केलेल रिमिक्स नृत्यास भरपूर टाळ्या भेटल्या.

विविध गाण्यांचे केले सादरीकरण
‘सांग सांग भोलानाथ,’ ‘छम छम छम’, ‘अग्गोबाई ढगोबाई,’ या बालगीतांवर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले.’गोमू माझी माहेरा जाते’ या कोकणी गितावर तर ‘चांदणं चांदणं सारी रात’ या लोक गितावर तसेच ‘अप्सरा आली’ या लावणीवरही बाल कलाकरांनी बहारदार नृत्य सादर केले. हवा हवाई,नगाडा संग ढोल बाजे, बलम पिचकारी तुने जो मुझे मारी,जोगाडा तारा, जलवा जलवा,बोले चुडीया बोले कंगना,आदि हिंदी गितांवर कौतुकास्पद नृत्य सादर केले. याप्रसंगी संख्येचे चेअरमन डॉ.शशांक जोशी, सोमनाथ ब्रह्मे, श्री.मुंडके यांनीही यावेळी भेट दिली.आभार प्रदर्शन ऋषिकेश महाळपूरकर यांनी केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदा पाटील, धर्मा धनगर,परशुराम गांगुर्डे, सौ.संध्या धबु आदिंसह पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी अश्विनी पाटील, मनीषा मोरे, वासंती भोसले, गीतांजली पवार, मछिंद्र शिवपदे, सरोज मोरे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठयसंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Exit mobile version