Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधानमंत्री आवास योजनेचा रखडलेला हप्ता त्वरीत अदा करावा; राष्ट्रवादीची मागणी

सावदा ता. रावेर , प्रतिनिधी । येथील नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना केंद्र शासनाचा रखडलेला हप्ता निधी त्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यात अदा करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक फिरोज खान हबीबुल्लाखान पठाण यांनी निवेदन देवून मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, सावदा नगरपरिषद अंतर्गत डी पी आर क्रं.1 (237) दि. 8 मार्च 2019 रोजी मंजूर झाला आहे.  या प्रकल्प अहवालाचे आतापर्यंत फक्त राज्य शासनाचे प्रथम मुद्दा 40000 प्रमाणे एकूण 94.3 लक्ष निधी प्राप्त झाला आहे. सदरहू प्राप्त निधी मधून लाभार्थ्यांना निधीचे वाटप करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपले राहते घर अकलूज घरकुलाचे काम सुरू केले आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांची घरे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे त्यांची राहण्याची गैरसोय होत आहे त्याचबरोबर पैशाअभावी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामात सातत्य राहत नसल्याने त्यांचे गवंडी, मिस्त्री हे सुद्धा कायम टिकून राहत नाही. पर्यायाने त्यांना होत असलेल्या त्रासामुळे नगरपरिषदेवर रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे वरील प्रमाणे डी.पी.आर. क्र 1 (226) ची केंद्र शासनाचा प्रथम हप्ता निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन नगरसेवक फिरोज खान हबीबुल्लाखान पठाण, राजेश वानखेडे, सिद्धार्थ बडगे, सिद्धार्थ किटकुल आदींनी दिले आहे.

Exit mobile version