Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अडावदच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली रूग्णवाहिका

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यास मिळालेल्या रूग्णवाहिकांपैकी एक रूग्णवाहिका अडावदच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली असून याचे लोकार्पण आज जि.प. आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

संपूर्ण जगाला कोरोनाने  विळखा घालून तो आपल्या पर्यंत येऊन पोहोचला आहे.आजपर्यंत लाखोलोकांना कोरोनाची लागण होऊन हजारोलोक मृत्यूमुखी पडले आहे.

कोरोनाने आपल्याला खूप काही शिकविले आहे. कोरोनाच्या तिसरी लाटची येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ,आणि गाफील राहून आपण ती शक्यता नाकारु शकत नाही. कोरोनाच्या महामारीने हातावर पोट भरणाऱ्याचे स्थर्य गेलेले आहे.हाताला काम नाही पोटाला अन्न नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे.कोरोनाच्या कठीण प्रसंगात माणसांना सर्व प्रकारची मदत, विशेषतः या काळात औषधोपचार करणे , रुग्णांना आवश्यक ती मदतकरणे हीच आपली प्राथमिकता असली पाहिजे.गरीब रुग्ण पैशांअभावी तळमळत असतो असे चित्र नेहमीच आपणास पहावयास मिळत आहे.

रुग्णालयात उपचारासाठी पोहोचण्यासाठी साधनांची उपलब्धता नसल्याने  हजारो लोकांनी आपले प्राण गमावल्याची उदाहरणे आपल्या समोर डोळ्यासमोर आहेत.अश्या गरीब,गरजू ,असहाय रुग्णांना कोविड कामात तात्काळ रुग्णालयापर्यंत आणता यावे त्यांना लवकरात लवकर उपचार उपलब्ध व्हावे या उद्देशाने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी राज्यशासनाकडे नवीन अद्यावत सामग्रीने सुसज्ज मोबाईल मेडिकल युनिट रुग्णवाहिकांची मागणी केली होती व ती मागणी ना.गुलाबरावजी पाटील यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नाने पूर्ण होऊन पहिल्या टप्प्यात जिल्ह्यसाठी १३ रुग्णवाहिका मिळालेल्या आहे त्यापैकी एक रुग्णवाहिका अडावद प्रा.आ.केंद्र ला मिळालेली आहे.याचा लाभ आदिवासी, दुर्गम,पाड्यांवर राहणाऱ्या लोकांना थेट मिळणार आहे.रुग्णवाहिका मिळाल्याने गावात व परिसरात आनंद व सुरक्षेची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे.

या निमित्ताने आज अडावद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पारपडला या प्रसंगी जी.प.आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जी.प.सदस्य दिलीप युवराज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. चंद्रशेखर युवराज पाटील उर्फ कालु दादा खर्डी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ना.गुलाबरावजी पाटील  व शासनाचेआभार मानले. कार्यक्रम प्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते—–

शांताराम आबा पाटील माजी जी.प.सदस्य, चंद्रशेखर युवराज पाटील दोडे गुजर समाज अध्यक्ष जळगाव जिल्हा, फारूक पटेल सर,पी.आर.माळी सर, वडगावचे उपसरपंच नामदेव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनकर देशमुख , पत्रकार जितेंद्रकुमार शिंपी, समाजसेवक श्रीकांत दहाड, युवनेते राकेश पाटील, शेटे सर, ग्रा.प.सदस्य हनुमंत झगा महाजन, जावेद खान, कालु मिस्तरी, वासुदेव महाजन, शकिलोद्दी  शमसोद्दीन, माजी ग्रा.प.सदस्य वजाहत अली काझी, जहांगीर पठाण, अमोल कासार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णुप्रसाद दायमा , मनु देशमुख, सुधीर चौधरी, डॉ.चव्हाण मॅडम, जितेंद्र परदेशी, लक्ष्मण पाटील, भूषण पाटील, सुनील सारस्वत, रेहान मलिक, बाबू शेख, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यांचे कर्मचारी, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक , पत्रकार बंधू इ.मोठया संख्येने उपस्थित होते या ठिकाणी मान्यवरांचा गुलाबपुष्प शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन फारूक पटेल सर यांनी केले

Exit mobile version