Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या आरोपीस चाळीसगावातून अटक

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहर पोलीसांनी काल रात्री कोबिंग ऑपरेशन राबवित असतांना दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला आरोपीस अटक करण्यात आली. हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी चाळीसगाव शहर पोलीसांनी रात्री १ वाजता शहरातील लक्ष्मीनगरात कोंबिंग ऑपरेशन राबवित असतांना दोन वर्षांसाठी जळगाव, धुळे, औरंगाबाद, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार असलेला आरोपी हा घरी आढळून आला. अक्षय भानुदास पाटील (वय-२४) रा. लक्ष्मी नगर असे आरोपीचे नाव आहे. संशयितावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलीस नाईक भुषण पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल टकले, पोलीस नाईक राहूल सोनवणे, विनोद भोई, विजय पाटील यांनी ही कारवाई केली.

Exit mobile version