Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुरभि महिला मंडळाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात

surabhi mahila mandal

जळगाव, प्रतिनिधी | येथील सुरभि महिला मंडळाचा १८ वा वर्धापन दिन आज (दि.३०) रोजी सायंकाळी ता केक कापून तसेच सिव्हिल हॉस्पिटल सेवालय येथे नवजात शिशू आणि त्यांच्या मातांना साडी, झबले, पौष्टिक आहार, नॅपकिन, आणि अल्पोहार देऊन साजरा करण्यात आला.

 

ह्यावेळी नवजात शिशूंच्या मातांशी संवाद साधून त्यांना सकस आहार, स्वच्छता, बाळाची काळजी याचे महत्व सांगण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी, रेवती शेंदुर्णीकर, मंजुषा राव, विनया भावे, वैदेही नाखरे, ज्योती भोकरडोळे, सुनिता सातपुते, वैशाली कुळकर्णी, माधुरी फडके, अश्विनी जोशी, निलिमा नाईक, संजिवनी नांदेडकर यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी तनुजा पाठक ह्यांनी सहकार्य केले.

Exit mobile version