Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाकरे सरकारचे बारा वाजणार : सोमय्या

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वर्तुळाला हादरा बसला असतांनाच किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारचे बारा वाजणार असल्याचा दावा केला आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सहकारी आमदारांसह गुजरातमध्ये दाखल झाले असून ते सूरत येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलच्या भोवती अतिशय कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. स्वत: गुजरातचे मुख्यमंत्री या स्थितीवर नजर ठेवून आहेत. शिंदे यांच्यासोबत ११ वा १३ आमदार असण्याची शक्यता असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी अजून काहीही स्पष्ट झाले नसतांनाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ठाकरे सरकारचे बारा वाजणार असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी काल फुटलेल्या मतांची आकडेवारीच सादर केली आहे. यामुळे आता पुढे नेमके काय होणार याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version