Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे ठाकरे गटाच्या युवासेनेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत सत्काराचे कार्यक्रम संपन्न

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  यावल येथील शहर शिवसेनेच्या वतीने युवासेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन व सत्कार सभारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी यावल येथील शिवसेना ( उबाठा) च्या संपर्क कार्यालयात आयोजीत या स्वागत सत्कार कार्यक्रमास शिवसेना ( उबाठा)चे जळगाव उपजिल्हा प्रमुख गोपाळ चौधरी, यावल शहर प्रमुख जगदिश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी, माजी तालुका प्रमुख कडू पाटील, शहर उप प्रमुख संतोष धोबी, तालुका उप संघटक पप्पू जोशी, शहर उप प्रमुख योगेश चौधरी,शहर उप प्रमुख योगेश राजपूत पाटील, आदिवासी सेना तालुका प्रमुख हुसेन तडवी,विभाग प्रमुख प्रल्हाद बारी, विभाग प्रमुख प्रविण लोणारी, नवनियुक्त युवासेना पदाधिकारी उपजिल्हा अधिकारी सागर देवांग, युवा सेनेचे तालुका अधिकारी डॉ विवेक अडकमोल,शहर अधिकारी विजय पंडित कुंभार, युवासेना शहर उप प्रमुख पिंटू कुंभार यांचे सह शिवसैनिक उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तसेच विविध विषयांवर चर्चा शहर प्रमुख जगदिश कवडीवाले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार हुसैन तडवी यांनी मानले .

Exit mobile version