Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन तलवार आणि कुकऱ्यासह दहशत माजविणारा तरूण पोलीसांच्या ताब्यात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भोईटे वाडा चौकात तरूणाला दोन तलवार आणि कुकऱ्यासह यावल पोलीसांनी शुक्रवारी २५ मार्च रोजी रात्री अटक केली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे यावल शहरात खळबळ उडाली आहे. तरूणाच्या ताब्यातील  तलवारी आणि कुकऱ्या हस्तगत केल्या आहेत.

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “यावल शहरातील भोईटे वाडा चौकात एक तरुण हातात तलवार घेऊन दहशत पसरवीत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार असलम खान दिलावर खान, भूषण चव्हाण, सुशील घुगे, राजेश वाडे आणि निलेश वाघ असे पथक तयार करून त्यांना रवाना केले.

शुक्रवारी, २५ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास यावल शहरातील भोईटे वाडा चौकात संशयित आरोपी किशोर गुलाबराव भोईटे (वय-२५) रा. भोईटे वाडा, यावल याला अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन तलवारी आणि कुकऱ्या हस्तगत केल्या आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल निलेश वाघ यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलिस कर्मचारी करीत आहे.

या प्रकरणातील संशयीत आरोपी यास आज शनिवारी यावल न्यायालयात हजर केले असता न्या.एम एस बनचरे यांनी संशयीत आरोपीस तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version