Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तलवार घेवून दहशत माजविणाऱ्यास अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील जुना खेडी रोड परिसरातील बाबुराव नगरात बेकायदेशीरित्या हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा सुभाष ठाकूर (वय-२४) रा. वाल्मिक नगर, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरातील बाबुराव नगरात संशयित आरोपी कृष्णा ठाकूर हा हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या.  त्यानुसार पथकाने सोमवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपी कृष्णा ठाकूर याला अटक केली. त्याच्याजवळील लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. पोहेकॉ अमोल विसपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.

Exit mobile version