Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्रीनगर येथे दहशतवादी हल्ला : पाच गंभीर

shrinagar

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या हरी सिंह मार्गावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला असून त्यात ५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वाहनांचे देखील नूकसान करण्यात आले आहे. या घटनेमुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

हरी सिंह मार्गावर सुरक्षादलाची चौकी असून तिथून काही अंतरावरच असलेल्या मार्केट परिसरात दहशतवाद्यांनी ग्रेनेड स्फोट घडवून आणले. त्यानंतर दहशतवादी तिथून पसार झाले. स्फोटांनी परिसरात एकच दहशत व घबराट पसरली. या हल्ल्यात ५ जण जखमी झाले असून काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. सर्व जखमींना श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. श्रीनगरच्या विविध भागांत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला असून लोकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. याआधी अनंतनाग जिल्ह्यातही अशाचप्रकारे ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Exit mobile version