Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र मनियार बिरादरीच्या अधिवेशनात विविध १० ठराव संमत

WhatsApp Image 2019 12 08 at 6.00.33 PM

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यातील मनियार बिरादरीचे खुले अधिवेशन इदगाह मैदानातील हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये २००२पासून महाराष्ट्र मनियार बिरादरीचे कार्य बंद झाले होते ते कार्य पुनश्च सुरू करण्यात यावे व यासाठी महाराष्ट्राच्या मन्यार बिरादरीच्या अध्यक्षपदी जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

महाराष्ट्र मन्यार बिरादरीची कार्यकारणी – मानद सचिव म्हणून जळगावचे डॉ. अल्तमश शेख, खजिनदार म्हणून नाशिकचे जावेद गुलाम, कार्याध्यक्ष म्हणून नंदुरबारचे अब्दुल बारी, उपाध्यक्ष म्हणून जालन्याचे मन्नान शेख तर मुंबईचे मुश्ताक शेख, सहसचिव म्हणून सोनगीरचे आरिफ शेख, तर मलकापूरचे इक्बाल शेख, प्रादेशिक अध्यक्ष म्हणून मुंबई विभागाचे रफिक मणियार, पश्चिम महाराष्ट्राचे धुळे येथील डॉ. सलीम शेख, प्रादेशिक सचिव मुंबईचे ठाणा येथील अब्दुल वहाब शेख, पश्चिम महाराष्ट्रमधून नंदुरबारचे वकार शेख, संचालक म्हणून बुलढाण्याचे सय्यद मुस्ताक, अहमदनगरचे एजाज मोहम्मद गौस ,शहादाचे जाकीर मोहम्मद, भुसावळचे साबीर शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.वित्तीय समितीच्या अध्यक्षपदी भुसावळचे सलीम शेख यांची सुद्धा निवड करण्यात आली.

अधिवेशनातील प्रमुख ठराव : सिटिझनशिप व एन आर सी कायदा रद्द करण्यात यावा, मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यात यावे
, मन्यार जातीचा भटक्या-विमुक्त जमातीत समावेश करण्यात यावा , मुस्लिम समाजातील होतकरू व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी, खासदार व आमदार निधीतून मन्यार बिरादरीसाठी समाज मंदिर बांधून देण्यात यावे , खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी महात्मा गांधी व शहिद करकरे यांचा अपमान केल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी.बलात्कार सारख्या घडणाऱ्या घटना आटोक्यात आणण्यासाठी कडक कायदा करून आरोपींना जामीन मिळता कामा नये, पीडितेस व त्याच्या नातेवाईकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. काँग्रेस पक्षाने माजी आमदार आसिफ शेख यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, महाराष्ट्र अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गफार मलिक यांनासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषद वर घ्यावे असे ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले  या अधिवेशनात ३६ पैकी १७ जिल्ह्यांचा समावेश होता. या चर्चेत धुळ्याचे अश्फाक खान, नंदुरबारचे लियाकत अली, शहादा चे जाकीर मन्यार, जळगाव पाळधीचे अजिज शेख, सिल्लोडचे शेख मन्नान, शहादाचे वकार खान, मोटला मलकापूरचे इक्बाल खान, बोदवडचे रफिक मणियार ,पिंपळगाव बसवन्तचे समीर बशीर, धुळे येथील डॉ. मोहम्मद सलीम, अडावद शब्बीर अहमद, धुळ्याचे मोहम्मद साकिब इंजिनियर, नंदुरबारचे अब्दुल बारी अब्दुल समद, मुक्ताईनगरचे हकीम चौधरी, नंदुरबारचे अब्दुल नासीर, साखलीचे शेख असलम, सोनगीरचे आरिफ खान, कल्याणचे रफिक मेहबूब, नाशिकचे जावेद गुलाम, जळगावचे जमिल इंजिनियर, धुळेचे शफी मंडपवाले, शहादा चे जाकीर हाजी, नंदुरबार चे जुबेर अहमद, जळगाव चे डॉ. अल्तमश, डॉ. फारुक साबीर, डॉ. रईस कासार, शिरपूरचे सोहेल खान व युनुस शेख तसेच नंदुरबारचे नासीर खान यांनी चर्चेत सहभाग नोंदविला. अधिवेशनचे सूत्रसंचालन फारूक शेख तर आभार नवनिर्वाचित सचिव डॉ. अल्तमस शेख यांनी मानले.

Exit mobile version