Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तेली समाजाची जिल्हास्तरीय तंटामुक्ती समिती गठित, बैठकीत एकमताने निवड

जिल्हाध्यक्षपदी माजी आ.  शिरीष चौधरी यांची तर कार्याध्यक्षपदी दत्तात्रय चौधरी यांना संधी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील तेली समाजातील लहान मोठे वाद व तंटे सोडवण्यासाठी जळगाव जिल्हा तेली समाज तंटामुक्ती समितीची रविवारी २९ ऑक्टोबर रोजी स्थापना करण्यात आली. समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी एकमताने माजी आमदार शिरीष चौधरी यांची तर कार्याध्यक्ष म्हणून दत्तात्रय चौधरी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा करून प्राथमिक नियोजन करण्यात आले.

जळगाव जिल्हा तेली समाजाची जिल्हास्तरीय बैठक शहरात आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी माजी आ. शिरीष चौधरी होते. तर तंटामुक्त समितीची नवीन कार्यकारिणी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी बैठकीमध्ये तंटामुक्त समितीची कार्यपद्धती तसेच कामकाज कसे करावे याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली.  तंटामुक्त समितीच्या माध्यमातून समाज बांधवांनी असलेले वाद मिटवायचे अशी माहिती  देण्यात आली.

यावेळी जळगाव जिल्हा तेली समाज तंटामुक्त समिती गठित करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांची निवड करण्यात आली.  बैठकीत कार्याध्यक्ष दत्तात्रय चौधरी, अड. महेंद्र चौधरी, राजेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

शिरीष चौधरी यांनी अध्यक्षस्थानावरून सांगितले की, समाजप्रबोधन करणे महत्वाचे झाले आहे. शिक्षित व्यक्तींमध्येच जास्त फरकती वाढल्या आहेत. मुला- मुलींपेक्षा त्यांच्या पालकांच्याच अपेक्षा खूप वाढल्या आहेत. तंटामुक्ती करत असताना तटस्थ राहूनच कार्यकारिणीने काम करत राहावे अशी अपेक्षाही शिरीष चौधरी यांनी व्यक्त केली.

बैठकीला जिल्हाभरातील १५ तालुक्यांमधील सुमारे ३०० प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी करून आभार मानले.

कार्यकारिणीची निवड

कार्यकारिणी मध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जीवन चौधरी, गोपाळ चौधरी, दिलीप चौधरी, संतोष चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून दत्तात्रय तुकाराम चौधरी  तर जिल्हा सचिव म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.  जिल्हा सहसचिव म्हणून अशोक चौधरी, जिल्हा संघटक प्रमुख म्हणून डॉ. मनीलाल चौधरी, सुनील चौधरी,  नारायण चौधरी, नंदू चौधरी,  हिरामण चौधरी, महेश चौधरी यांची तर जिल्हा खजिनदार म्हणून विनोद चौधरी, कायदेशीर सल्लागार अँड. महेंद्र चौधरी, ज्येष्ठ सल्लागार बी. एन. चौधरी, सुरेश चौधरी, राजेंद्र चौधरी, सुरेश नाना चौधरी, भोला चौधरी यांची निवड झाली.

तर सदस्यपदी पारोळा येथील अनिल चौधरी, धरणगाव येथील सुनील चौधरी, चोपडा येथील प्रकाश चौधरी,  चाळीसगाव येथील दिलीप चौधरी,  जामनेर येथील संतोष चौधरी, भुसावळ येथील बाळू चौधरी, रावेर येथील अनिल चौधरी, यावल येथील भरत चौधरी, वरणगाव येथील बाळासाहेब चौधरी, पहुर येथील अमोल बावस्कर, चोपडा येथील सुधाकर चौधरी, यावल येथील अभिमन्यू चौधरी यांना सदस्यपदी संधी देण्यात आली आहे.

Exit mobile version