Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टेलिफोन कंपन्या १ डिसेंबरपासून टेरिफ प्लानमध्ये वाढ करणार

mob

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील टेलिकॉम कंपनी आयडिया, व्होडाफोन, जिओ, बीएसएनएल आणि एअरटेलने १ डिसेंबरपासून त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नजीकच्या काळात ३० ते ४५ टक्के दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे इंटरनेट सेवा महागणार असून भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांना याचा फटका बसणार आहे.

जगभरातील चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या तुलनेत सर्वात स्वस्त मोबाइल डेटा सेवा भारतात मिळत आहे. भारतीय बाजारात एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाची सर्वात जास्त भागीदारी आहे. दोन्ही कंपन्यांनी वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. सुप्रीम कोर्टाने एका जुन्या प्रकरणावर सुनावणी करताना आदेश दिले होते की, टेलिकॉम कंपन्यांना ९० हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागणार आहे. यानंतर व्होडाफोनने नुकतेच सांगितले की, मोबाइल डेटा आधारित सेवेला वाढती मागणी असूनही भारतात सर्वात स्वस्त मोबाइल डेटा मिळतो आहे. व्होडाफोन आयडिया १ डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर वाढवणार असल्याने इंटरनेट सेवा महागणार आहे. तसेच एअरटेलकडूनही याची घोषणा करण्यात आली आहे. नवीन दर किती असणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. जिओ आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने याची घोषणा केली आहे. मोबाइल कंपन्या इंटरनेटचे दर वाढवणार असल्याने याचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे. भारतात २२ टेलिकॉम सर्कल आहे. त्यात तीन गट आहेत.

Exit mobile version