Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तहसीलदारांसह जळगाव वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सत्कार

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे येथील तहसीलदार व जळगाव वकील संघाचे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

नवनियुक्त अध्यक्ष अॅड. ढाके, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मंडोरे नूतन पदाधिकारी अॅड. वैशाली महाजन, अॅड. स्वप्नील पाटील, अॅड. विशाल घोडेस्वार, अॅड. देवता पाटील, अॅड. दीपाली भावसार, अॅड. शीतल राठी, अॅड. अजय पाटील, अॅड. दीपक वाघ, अॅड. हर्षल देशमुख, अॅड. हेमंत गिरणारे, अॅड. खुशाल जाधव, अॅड. निखिल पाटील, अॅड. नीलेश जाधव, अॅड. विवेक पाटील यांच्यासह अमळनेरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना उत्कृष्ट तहसीलदारांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव,  मुख्याधिकारी प्रशांत सरोदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी प्रास्ताविकातून मंगळग्रह देव मंदिराच्या विकासाची  एकूणच माहिती सांगितली. अॅड. मंडोरे यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले . भगवान मंगळग्रह देवांची या मंदिराच्या प्रगतीसाठी नेहमी कृपादृष्टी राहील, असा मला विश्वास आहे. तहसीलदार वाघ यांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या प्रामाणिक व कल्पक प्रयत्नांची प्रसंशा करून मंदिराचे भवितव्य उज्वल असल्याचे सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांनी संस्था पोलीस व प्रशासनाला करीत असलेल्या सहकार्याचे कौतुक केले.

अॅड. ढाके म्हणाले की, श्रावण मासातील पहिल्याच सोमवारी लघुरुद्र महापूजा अभिषेक माझ्या हस्ते झाली, ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल. आत्मिक समाधानाचे एक दैवी केंद्र म्हणून मला मंगळग्रह मंदिरात अनुभूती प्राप्त झाली. मंगळग्रह देवता आगामी काळात नक्कीच या परिसराच्या कायापालटासाठी कृपाशीर्वाद कायम ठेवतील.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील, उपविभागीय अभियंता सतीश वारुळे, सरकारी वकील राजेंद्र चौधरी ,  ऍड. शशिकांत पाटील व ऍड. बागुल तसेच ऍड. प्रदीप भट, ऍड. सुरेश सोनवणे, डॉ.प्रशांत शिंदे ,उदय खैरनार, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सेवेकरी उज्वला शाह, सुनीता कुलकर्णी, विनोद कदम, संस्थेचे ग्रिनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, बांधकाम कन्सल्टंट , संजय पाटील,मारवडचे एपीआय जयेश खलाणे, सेवेकरी विनोद अग्रवाल, व्ही. व्ही.कुलकर्णी, आर.जे.पाटील, उमाकांत हिरे, राहुल पाटील, आदी उपस्थित होते. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव दिलीप बहिरम यांनी आभार मानले.

Exit mobile version