Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना संकटकाळात तहसीलदार कुवर यांची उत्कृष्ट कामगिरी; जिल्ह्याधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या महामारीत महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन नागरी सेवेची उत्कृष्ट कामगीरी करत जनतेच्या मनात शासनाच्या कार्याबद्दल विश्वास निर्माण करण्यात प्रभावीपणे कामगिरी केल्याने यावल येथील तहसीलदार जितेंद्र कुवर यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या संकटात संपुर्ण जिल्ह्यात महसुल प्रशासनाच्या योजनां प्रभावीपणे अमलात आणून जनहितासाठी विविध उपाय-योजना केल्याबद्दल तसेच कोरोना विषाणुसंसर्गास आटोक्यात आणण्याकरीता महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हाभरातील अधिकाऱ्‍यांचा जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या वतीने प्रशिस्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांचा देखील समावेश असून त्यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सन्मानपत्र देऊन त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली आहे. तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी संचारबंदी काळात तालुक्यातील सुमारे एक लाख ३१ हजार नागरिकांपर्यंत शासनाचे मोफत धान्य वितरण करणे.

तसेच तालुक्यात कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी जनतेत प्रभावी व यशस्वी प्रचार-प्रसार, लोकवर्गणीतुन यावल तालुक्यात कोविड सेंटर उभारणी कार्यावंतीत करणे इतर रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध केल्यात यावलच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर उभारणी , याशिवाय तालुक्यातील अति दृर्गम क्षेत्रात वास्तव्यास राहणाऱ्या आदीवासी बांधवांना पाडयावर जावुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व जिवनावश्क वस्तुंचे वितरण करणे व कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी विशेष लक्ष ठेवुन शासनाकडून येणाऱ्या आदेश तात्काळ अमलंबजावणी करून नागरीकांमध्ये शासनाच्या कार्याबद्दल विश्वास निर्माण करण्याचे उत्कृष्ट व उल्लेखनीय असे कार्य यावल तालुक्यात केल्याची दखल स्वता: जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतली व त्यांचा प्रशिस्तपत्र देऊन सन्मान केला आहे.

Exit mobile version