Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील हवामानावर आधारित फळपीक विमा यंत्रणेसाठी नवीन जागेची तहसीलदारांकडून पाहणी

यावल प्रतिनिधी । यावल तालुका कृषी अधिकारी कार्यालयात हवामानावर आधारित फळपीक विमा यंत्रणा लावण्यात आली होती. दरम्यान मनसेने दोन महिन्यापुर्वी ही यंत्रणा दुसर्‍या जागी हलवण्याबाबतचे लिखित निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत आज तहसीलदार महेश पवार यांच्या पथकाने प्रस्तावित नवीन जागांची पाहणी केली.

यावल तालुका कृषी अधिकारी कार्यालयात हवामानावर आधारित फळपीक विमा यंत्रणा लावण्यात आली होती. परंतू निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांनी वेधशाळेची जागा ही चुकीची असल्याची माहीती देण्यात आली होती.यावल मनसेचे  रावेर लोकसभा जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी २६ जुलै २०२१ रोजी तहसीलदार यांची भेट घेवून सदरील यंत्रणानेची जागा चुकीची असून नवीन जागेत हलविण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात तहसीलदारांनी तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार  कृषी तालुका अधिकारी रमेश जाधव यांनी यावल तालुक्यातील हवामान खात्याची यंत्रणा सदोष असून वेधशाळेची जागाही चुकीचे असल्याचे सांगितले.

या अनुषंगाने आज बुधवारी ८ सप्टेंबर रोजी कृषी अधिकार्‍यांच्या कार्यालयात निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी प्रस्तावित असलेली यावल कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, शासकीय गोदाम सातोद रोड यावल आणि जे.टी. महाजन सुतगिरणी यावल या तीन जागांची पाहणी केली. हवामानावर आधारित फळपीक विमा यंत्रणा जागा हलवण्याचा संदर्भातील लिखित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.  याप्रसंगी कृषी खात्यांचे अधिकारी स्वयंचलित फळपिक विमा यंत्रणेचे अधिकारी, यावल पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. पी. कोते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जनहित चेतन अढळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, वड्री ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ललित चौधरी, महाराष्टू नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष किशोर नन्नवरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version