Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आणीबाणी म्हणजे काळा अध्याय : मोदी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय असून आपण लोकशाही अजून मजबूत करूया असे आवाहन आज पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. देशातील आणीबाणीला ४६ वर्षे पूर्ण होत असतांना त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या भावना व्यक्त केल्या आहेत.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. त्या घटनेस ४६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इतिहासातील आणीबाणीच्या घटनेकडे मागे वळून पाहत असताना लोकशाही अधिकाधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. या घटनेतील मूल्यांची जोपासना करण्यासाठी प्रयत्न करूया, असे मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. आणीबाणीचे काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत. १९७५ ते १९७७ या कालावधीत संस्थांचे पध्दतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध झाले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version