Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘टिम इंडिया’ने वचपा काढला : कागारूंवर दणदणीत विजय

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढत टिम इंडियाने येथील टी-२९ सामन्यात कागारूंना पराभूत केले.

पहिल्या सामन्यात कागांरूंनी भारताला पराभूत केले होते. यातच पावसामुळे मैदान ओले असल्यामुळे २० षटकांऐवजी नागपुरातील सामना आठ षटकांचा खेळविण्यात आला. यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी प्रारंभीच पाहुण्या संघाला धक्के दिले. दुसर्‍याच षटकात कॅमेरॉन ग्रीन (५) आणि ग्लेन मॅक्सवेल (०) यांच्या विकेट्स गमावल्या. ग्रीनला विराट कोहलीने धावबाद केले, तर मॅक्सवेलला अक्षरने त्याच्या फिरकीच्या जाळ्यात झेलबाद केले. यानंतर अक्षरने टीम डेव्हिडला (२) बाद केल्याने कांगारू अडचणीत आले. यानंतर मात्र कर्णधार ऍरॉन फिंचला (३१) व मॅथ्यू वेडने ( नाबाद ४३) आठ षटकात पाच विकेट्सवर ९० धावा करता आल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात रोहित शर्माने दोन आणि केएल राहुलने एक षटकार ठोकला. राहुलला तिसर्‍या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ऍडम झाम्पाचा बळी ठरला. केएल राहुल बाद झाल्यानंतर लागोपाठच्या चेंडूंमध्ये कोहली (११) आणि सूर्यकुमार यादव (०) बाद झाले. हार्दिक पांड्या १० धावा करून झेलबाद झाला. हार्दिक बाद झाला तेव्हा भारताला सात चेंडूत १४ धावा करायच्या होती. सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहितने चौकार मारल्याने विजयाचा मार्ग मोकळा केला. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ९ धावा करायच्या होत्या, मात्र दिनेश कार्तिकने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने २० चेंडूत ४६ धावा ठोकल्या. तोच भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला.

Exit mobile version