Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संपावर

WhatsApp Image 2019 03 07 at 3.20.37 PM

यावल (प्रतिनिधी)। येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार दिनांक 5 मार्च, 2019 पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्याची माहिती शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष व कार्यालय अधिक्षक श्री. आर.ई. पाटील व लेखापाल श्री. किरण देशमुख यांनी एका पत्रकान्वये दिली. गुरुवारी संपाचा तिसरा दिवस आहे.

शासनाचा आश्वासित प्रगती योजना अंतर्गत 12 किंवा 24 वर्ष सेवा करणार्‍या करकर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच वेतनवाढ देण्यात आली होती;मात्र शासनाने या योजनेची आर्थिक विभागाकडून मान्यता घेतली नसल्यामुळे डिसेंबर 2018 व जानेवारी 2019 मध्ये योजना रद्द बाबत जीआर काढले. त्यामुळे शासनाने काढलेले योजना रद्द बाबतच्या जीआरमुळे महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून हे जीआर रद्द करण्यात यावे, आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ सुरू राहावा.यासाठी यावल महाविद्यालयातील कर्मचारी महाविद्यालयाच्या आवारात बेमुदत संपावर गेलेले आहेत.या संपात एकुण 18 शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले आहेत.

Exit mobile version