Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टाकरखेडा शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील उपशिक्षका श्रीमती जयश्री पाटील ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील सर्व शिक्षक तसेच मुख्याध्यापक उपस्थित होते.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती तर्फे तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक जयवंत सुरळकर यांच्या तर्फे शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील, केंद्रप्रमुख विकास वराडे, उपशिक्षक जयंत शेळके, जयश्री पाटील, छाया पारधे, निर्मला महाजन, नाना धनगर, रामेश्वर आहेर यांचा सत्कार शाल, श्रीफळ, रूमाल, टोपी, गुलाबपुष्प देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जयंत शेळके, नाना धनगर, श्रीमती निर्मला महाजन, श्रीमती जयश्री पाटील, मुख्याध्यापक पी.टी.पाटील, केंद्रप्रमुख विकास वराडे यांनी  शिक्षक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी केले व आभार मानले. सदर कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सोनाली गोसावी, सदस्य आशा सपकाळ, छाया पडोळ, निवृत्ती आगळे, सुभाष भोई, डॉक्टर देवानंद डाकोरकर, भरत पाटील, पोलीस पाटील समाधान पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, पालक अमृत दांडगे, दिपक लोहार, शिक्षणप्रेमी नागरिक जयवंत सुरळकर, नाना सुरळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सर्व वर्गात जाऊन शिक्षकांची भूमिका निभावली आऐ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Exit mobile version