Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरूण येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा

जळगाव प्रतिनिधी । मेहरुण परिसरातील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एड. रवींद्रभैय्या पाटील यांच्याहस्ते आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष रोहिणीताई खडसे यावलकर माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे सचिव अशोक लाडवंजारी, श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी उपाध्यक्ष बालाजी सानप वंदना चौधरी नगरसेविका अश्विनी देशमुख, डॉ. अभिषेक ठाकूर, मुख्याध्यापक दिवाकर जोशी योगेश वंजारी नामदेव चौधरी सुदाम पाटील प्रमोद बराटे, विशाल देशमुख ,रिजवान खाटीक ,मजहर पठाण, विकास पवार, मीनाक्षी चव्हाण हे प्रमुख अतिथी होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. श्रीराम माध्यमिक विद्यालय तर्फे व संस्थेतर्फे व विद्यालयातर्फे विद्यालयातील शिक्षिका प्रतिभा पाटील,  दिनेश पाटील, अतुल चाटे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार रवींद्रभैय्या पाटील, माजी मंत्री सतीश पाटील यांच्याहस्ते देण्यात आल. व सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले तर आभार दिनेश पाटील यांनी मानले

Exit mobile version