Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हृदयविकाराच्या झटक्याने शिक्षक प्रविण राणे यांचे निधन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी बु॥ येथील ज्योती विद्यालयाचे तरूण शिक्षक प्रविण राणे (वय३०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी बु॥ येथे (दि.१३ ऑगस्ट) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ज्योती विद्यामंदीर या शाळेतील प्रयोग शाळेचे शिक्षक प्रविण सुधाकर राणे (वय३० वर्ष) यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटका आला असता त्यांना तात्काळ यावल येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम तिळके यांनी त्यास मयत घोषीत केले. या संदर्भातील माहीती मिळताच मदतीसाठी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांच्यासमवेत अनेक समाज बांधव शिक्षक व शाळेतील कर्मचारी मोठया संख्येने ग्रामीण रुग्णालयात उपास्थित होते. 

याबाबत मयत प्रविण राणे यांचे मामा सुरेश चौधरी यांनी पोलीसात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रविण राणे हा मागील १२ वर्षापासुन ज्योती विद्यामंदीर या शाळेत तो शिक्षक म्हणुन कार्यरत होते. त्यास आई व दोन लहान भावंडे असुन सहा महीन्यापुर्वीच प्रविण राणेच्या वडीलांचा मृत्यु झाला होता. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रविण राणेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

 

Exit mobile version